Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोर्नोग्राफी प्रकरण: राज कुंद्राला मोठा धक्का, तुरुंगातच राहावे लागणार,मुंबई हायकोर्टाने सुटका करण्याची याचिका फेटाळली

पोर्नोग्राफी प्रकरण: राज कुंद्राला मोठा धक्का, तुरुंगातच राहावे लागणार,मुंबई हायकोर्टाने सुटका करण्याची याचिका फेटाळली
, शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (13:42 IST)
पोर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगात असलेल्या राज कुंद्राला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे.पॉर्न फिल्म प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने व्यापारी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा आणि रेयान थॉर्प यांची याचिका फेटाळून लावली,या मध्ये दंडाधिकारी न्यायालयाच्या रिमांड आदेशाला आव्हान दिले आणि त्वरित सुटका करण्या संदर्भात होते.अश्लील चित्रपट निर्मितीआणि अॅपद्वारे त्याच्या प्रदर्शनासंदर्भात तसेच अटकेला आव्हान देणाऱ्या व्यापारी राजकुंद्रा आणि त्याचा सहकारी रेयॉन थॉर्प यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी,हायकोर्टने सोमवारी  पूर्ण केली.त्यावर निर्णय नंतर घेतला जाईल असे सांगितले. 
 
या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई गुन्हे शाखेने नोंदवलेल्या प्रकरणाच्या तपासात कुंद्रा सहकार्य करत नाही आणि पुरावे नष्ट केले,असा युक्तिवाद पोलिसांनी उच्च न्यायालयात केला होता. पोलिसांचा हा दावा कुंद्राच्या वकिलांनी नाकारला. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आणि थॉर्प यांनी त्यांच्या याचिकांमध्ये असा युक्तिवाद केला होता की अटक बेकायदेशीर आहे आणि त्यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम 41 ए अंतर्गत नोटीस बजावण्याची अनिवार्य तरतूद चे पालन केले नाही. या दोघांनी याचिकेत उच्च न्यायालयाला विनंती केली होती की, त्यांची त्वरित सुटका करावी आणि त्यांना अटक केल्यानंतर पोलिस कोठडी देण्याचे दंडाधिकाऱ्यांचे दोन आदेश रद्द करावे.
 
फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 41 ए अनुसार, ज्या ठिकाणी अटक वॉरंट नाही तेथे पोलीस आरोपी व्यक्तीला समन्स जारी करू शकतात आणि त्याचे बयान नोंदवू शकतात. राज कुंद्राला गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी अटक केली होती, तर आयटी प्रमुख म्हणून काम करणाऱ्या रेयॉन थॉर्प ला 20 जुलै रोजी अटक करण्यात आली होती.दोघेही आता न्यायालयीन कोठडीत तुरुंगात आहेत.
 
संबंधित विकासात,सत्र न्यायालयाने सोमवारी कुंद्रा यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आपला आदेश राखून ठेवला.मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी नोंदवलेल्या अश्लील साहित्याशी संबंधित अशाच प्रकरणात अटकपूर्व जामिनाची मागणी केली आहे.सत्र न्यायालय 7 ऑगस्टला म्हणजेच आजच्या दिवशी अटकपूर्व जामीन अर्जावर आपला आदेश जाहीर केला. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

1 किलो भेंडी दे