Publish Date: Tue, 09 Feb 2021 (15:38 IST)
Updated Date: Tue, 09 Feb 2021 (15:40 IST)
बाहुबली'नंतर प्रभासची तरुणींमध्ये त्याची विशेष क्रेझ आहे. त्यामुळे कायमच सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये त्याच्या लग्नाची चर्चा रंगत असते. अनेकदा त्याचं नाव अनुष्का शेट्टीसोबतदेखील जोडलं गेलं. प्रभासअनुष्काच्या अफेअरची चर्चा रंगू लागली. या दोघांनी लग्न करावं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.
परंतु, प्रभास अनुष्कासोबत नाही तर एका एनआरआय मुलीसोबत लग्न करणार आहे. विशेष म्हणजे प्रभासचं लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेज असल्याचं म्हटलं जात आहे. प्रभासची होणारी पत्नी अमेरिकत वास्तव्यास असून तिचे वडील सॉफ्टवेअर कंपनीचे मालक आहेत. प्रभास आणि या मुलीच्या कुटुंबीयांनी चर्चा करुन हे लग्न ठरवलं आहे. तसंच प्रभासनेही होकार दिला आहे. प्रभासचा राधेश्याम' 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असून त्यानंतर प्रभासच्या लग्नाचा बार उडणार आहे. अद्याप प्रभास किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.