rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रभू देवा आणि सनी लियोनी यांचा चित्रपट पेट्टा रॅप या दिवसांत होईल रिलीज

Bollywood News
, गुरूवार, 5 सप्टेंबर 2024 (12:37 IST)
बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी आपला आगामी तामिळ चित्रपट पेट्टा रॅप मध्ये प्रसिद्ध कोरिओग्राफर, फिल्ममेकर आणि अभिनेता प्रभू देवा सोबत स्क्रीन शेयर करतांना दिसणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्याने सोशल मीडियावर एक नवीन पोस्टर सोबत चित्रपटाची रिलीज तारीख घोषित केली आहे. 
 
पोस्टरमध्ये सनी लियोनी आपल्या ग्लॅमरस रूपात दिसणार आहे.  पहिले असे सांगण्यात आले होते की, अभिनेत्री प्रभू देवा यांच्यासोबत नृत्य करणार पण जेव्हापासून ही बातमी समोर आली आहे तेव्हा पासून चाहते याची वाट पाहत आहे. 
 
यापूर्वी देखील सनी लियोनी ने तामिळ चित्रपट 'कोटेशन गॅंग' मध्ये आपल्या नवीन लूकने आपल्या चाहत्यांना सरप्राईज दिले होते. ज्यामध्ये ती एका आरोपीची भूमिका निभावत होती. तसेच चित्रपट  पेट्टा रॅप यामध्ये प्रभू देवा यांच्यासोबत अभिनेत्री वेदिका देखील झळकणार आहे. हा चित्रपट 27 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कनिपकम विनायक मंदिर, चित्तूर