Publish Date: Mon, 12 Mar 2018 (16:06 IST)
Updated Date: Mon, 12 Mar 2018 (16:10 IST)
सोशल मिडीया स्टार प्रिया वारियर लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असून रणवीरसोबत रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' चित्रपटात ती भूमिका साकारणार आहे. करण जोहरची सहनिर्मिती असलेल्या रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिम्बा' चित्रपटात प्रिया वारियर रणवीर सिंगसोबत झळकणार आहे.
प्रियाने रणवीरसोबत चित्रपट करणं हे आपलं स्वप्न असल्याचं सांगितलं होतं. तिच्या तोंडातून इच्छा व्यक्त होण्याचा अवकाश, ती पूर्ण झाली. सिम्बामध्ये प्रियाच्या वाट्याला आलेली भूमिका मात्र फार मोठी नाही, मात्र पहिलाच सिनेमा तिच्यासाठी लॉटरी ठरु शकतो.
प्रिया 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करणार आहे. या चित्रपटातील प्रिया झळकलेल्या 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. भुवया उडवणारा प्रियाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.