'पाहुना' सिनेमाचा पहिला लूक कान्समध्ये प्रदर्शित
Publish Date: Fri, 26 May 2017 (16:47 IST)
Updated Date: Fri, 26 May 2017 (16:53 IST)
कान्स फेस्टिवलमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राची पर्पल पेब्बल ही निर्मिती संस्थेच्या तब्बल सहा सिनेमांची घोषण करण्यात आली आहे. सध्या या सिनेमांवर काम सुरू आहे. पर्पल पेबलची निर्मिती असलेले सहा सिनेमे घेऊन प्रियांचा चोप्राची आई म्हणजेच मधु चोप्रा कान्समध्ये हजर होत्या. सिक्किम राज्यावर आधारीत 'पाहुना' या सिनेमाचा पहिला लूक कान्समध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. पाखी ए टायकवाला यांनी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. पाहुना हा सिनेमा सिक्किमवर प्रकाश टाकणार आहे. नेपाळमध्ये माओवाद्यांच्या हिंसेपासून वाचण्यासाठी तीन मुलं तेथून पळ काढतात आणि आपल्या आई-वडिलांपासून दूर होतात, याचं चित्रण सिनेमात करण्यात आलं आहे', असं मधु चोप्रा यांनी सांगितलं आहे.
पुढील लेख