Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंस्टाग्रामच्या एका पोस्टने 1.8 कोटी रुपये कमावते प्रियंका चोप्रा, जाणून घ्या विराटची कमाई

Priyanka Chopra Jonas
पूर्वी सोशल मीडिया केवळ एक सोशल प्लॅटफॉर्म होतं परंतू आता हे इन्कम सोर्स झालं आहे. टीव्ही आणि वृत्तपत्रांव्यतिरिक्त आता सोशल मीडियावर देखील जाहिराती बघण्यात येतात. मोठ्या-मोठ्या कंपन्या सेलिब्रिटीजला पैसे देऊन सोशल मीडियावर पोस्ट टाकतात. यासाठी कलाकारांना चांगलीच रक्कम मोजली जाते. सोशल मीडियाच्या सेलिब्रिटीजच्या कमाईचा अंदाज आपण या गोष्टीवर लावू शकता की इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करण्यासाठी प्रियंका चोप्रा 1.8 कोटी रुपये फीस घेते. असा दावा एक एजेंसीच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
 
ब्रिटनच्या सोशल मीडिया मॅनेजमेंट कंपनीने ‘2019 इंस्टाग्राम रिच लिस्ट’ जाहीर केली आहे ज्यात बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधार विराट कोहली यांना सामील करण्यात आले आहे.
 
या यादीप्रमाणे इंस्टाग्रामहून कमाई करण्यात पहिल्या क्रमांकावर मॉडल आणि बिझनेस वूमन काइली जेनर आहे. अलीकडे 2019 च्या फोर्ब्स द्वारे जाहीर ‘यंगेस्ट सेल्फ-मेड बिलिनियर’ या यादीत काइली यांचे नाव आाहे.
 
रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की प्रियंका चोप्रा इंस्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी 1.87 कोटी रुपये घेते. इंस्टाग्रामवर प्रियंकाचे 4 कोटी 30 लाख फॉलोअर्स आहे आणि या वर्षी तिला मोस्ट फॉलो अकाउंट अवार्ड देखील मिळालेले आहे. तरी प्रियंका चोप्राने या रिपोर्टवर काहीही टिप्पणी दिलेली नाही.
 
रिपोर्टप्रमाणे क्रिकेटर विराट कोहली देखील इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यासाठी 1.35 कोटी रुपये फीस घेतो. विराटला या वर्षी ‘एंगेज्ड अकाउंट ऑफ द इयर’ अवॉर्ड मिळाले आहे. विराट कोहलीने देखील या रिपोर्टवर कमेंट केलेले नाही. अशात या रिर्पोट्सवर विश्वास ठेवणे कठिण आहे.
फोटो: इंस्टाग्राम

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पोराचं प्रेम पाहून बाबांचे डोळे भरून आले पण...