प्रियंका चोप्राने सांगितले आपले फ्यूचर प्लान, 'आई' बनायचे आहे तिला

शनिवार, 7 सप्टेंबर 2019 (13:09 IST)
प्रियंका चोप्राने नुकतेच आपल्या पर्सनल लाईफबद्दल बरेचसे खुलासे केले आहे. एका मुलाखतीत प्रियंकाने आपल्या फ्यूचर प्लानबद्दल सांगितले आहे. प्रियंका म्हणाली सध्या माझा फ्यूचर प्लान आहे -  'घर शोधणे आणि मुलांना जन्म देणे. प्रियंका म्हणाली - माझ्यासाठी घराचा अर्थ आहे, ज्यांना मी प्रेम करते ते लोक माझ्याजवळ राहतील. ' 
 
प्रियंका म्हणाली, 'मी लॉस एंजेलिसला बर्‍याच वेळेपासून एक ऑप्शन म्हणून बघत होते. सध्या माझे मुंबई आणि न्यूयॉर्कमध्ये घर आहे. मला घरात पूल आणि बॅकयार्ड बनवायचे आहे ज्याने मुंबईची आठवण नेहमी माझ्या मनात राहील.'  
सांगायचे म्हणजे प्रियंका आणि निक जोनस पीपुल्स मॅगझिनच्या या वर्षाचे बेस्ट ड्रेस्ड सेलेब्सच्या लिस्टमध्ये सामील झाले आहे. हे कपल या लिस्टमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. असे पहिल्यांदाच होत आहे की मॅगझिनने या टायटलसाठी एखाद्या कपलला विजेतेम्हणून घोषित केले आहे. पीपुल्स स्टाइल ऍड ब्युटीची डायरेक्टर एंड्रियाने या जोडीची प्रशंसा करत म्हटले होते की, 'हा पहिलाच मोका आहे जेव्हा आमच्या टॉप 10 च्या लिस्टमध्ये एखादा पुरुष सामील झाला आहे. प्रियंका आणि निक याला डिजर्व करतात.' 
 
पिता आणि पती निकच्या या गोष्टी प्रियंकासाठी फारच अनमोल आहे ...
वैनिटी फेयरला दिलेल्या मुलाखतीत प्रियंकाने आपल्या लाईफच्या 2 फारच महत्त्वाच्या वस्तूंबद्दल सांगितले.  
 
प्रियंकाने सांगितले की तिचे मंगळसूत्र आणि तिचे वडील अशोक चोप्रा द्वारे दिलेली हिर्‍याची अंगठी ह्या दोन्ही वस्तू तिच्यासाठी फार स्पेशल आहे. प्रियंकाने म्हटले, 'माझ्यासाठी सर्वात जास्त किंमती वस्तू माझे मंगळसूत्र आहे. तसेच एक हिर्‍याची अंगठीदेखील माझ्यासाठी फारच खास आहे, कारण ती माझ्या वडिलांनी मला दिली होती.' 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख मिशन मंगल’ २०० कोटी रुपयांच्या दिशेने