अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘राबता’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या पोस्टरवर क्रिती आणि सुशांतची केमिस्ट्री पाहायला मिळत असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयीची उत्सुकता पाहायला मिळतेय. होमी अदजानिया यांची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजन यांनी केले आहे.
चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरवर झळकणारी ‘एव्हरिथिंग इज कनेक्टेड’ ही टॅगलाइनसुद्धा अनेकांचेच लक्ष वेधत आहे.