Publish Date: Sat, 29 Apr 2017 (08:24 IST)
Updated Date: Sat, 29 Apr 2017 (08:27 IST)
बॉलीवूडची हॉट अभिनेत्री राधिका आपटे नेहमी बोल्ड आणि सेक्सी अंदाजामुळे चर्चेत असते. यंदाही ती बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. या फोटोशूटचे खास वौशिष्ट्य म्हणजे, राधिकाने हे फोटोशूट कोणत्या स्टुडिओत न करता स्वत:च्या घरातच केले आहे. तिच्या या फोटोशूटमधील काही फोटो तिने इंस्ट्राग्रामवर शेअर केले आहेत. राधिका नेहमीच बोल्डपणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने 'पाच्र्ड' या चित्रपटात निभावलेल्या भूमिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली असून राधिकाने आतापर्यंत रजनीकांत, ऐश्वर्या रॉय-बच्चन, दीपिका पदुकोण आणि सोनाक्षी सिन्हा आदी दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. राधिकाने रजनीकांतसोबतचा अनुभव शेअर केला आहे. ती म्हणते की, खंर सांगायचं झालं, तर आम्हा दोघांनाही कधी मध्यस्थीची गरज लागली नाही. कबालीचे दिग्दर्शक रंजित यांनी मला चित्रपटात काम करणार का, अशी विचारणा केली असता मी क्षणाचाही विचार न करता होकार कळवला, कारण या चित्रपटात मला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत काम करायला मिळणार होते. तसेच ते माझे आवडते कलाकार असून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला सोडायची नव्हती. राधिकाने या चित्रपटात रजनीकांत यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.