सुपरस्टार रजनीकांत यांना 28 ऑक्टोबर रोजी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा पूर्ववत करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती आता सुधारत असल्याची माहिती मिळाली . सुपरस्टार रजनीकांत ( रजनीकांत अभिनेत्याच्या मेंदूला रक्तपुरवठा पूर्ववत करण्यासाठी रुग्णालयात उपचार घेतअसल्याचे सांगितले रक्त पुरवठा पुनर्संचयित(Blood supply Restoration) करण्यासाठी शुक्रवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि त्यांची प्रकृती आता बरी होत आहे. रजनीकांत यांना 28 ऑक्टोबरला चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे रुग्णालयाने सांगितले.
रजनीकांतवर CAR शस्त्रक्रिया झाली
कावेरी हॉस्पिटलने जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, रजनीकांतच्या प्रकृतीचे डॉक्टरांच्या तज्ञ पॅनेलने कसून मूल्यांकन केले आणि त्यांना कार्टॉइड आर्टरी रिव्हॅस्क्युलरायझेशन ( सीएआर ) शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्णालयाचे सह-संस्थापक आणि कार्यकारी संचालक डॉ अरविंदन सेल्वाराज यांनी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की ही प्रक्रिया (शुक्रवारी) यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि ते बरे होत आहेत. काही दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.