Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

20 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे रजनीकांतचा ‘रोबो 2.0’

20 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे रजनीकांतचा ‘रोबो 2.0’
सुपरस्टार रजनीकांतच्या चाहत्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे. रजनीकांतची निर्मिती असलेला ‘रोबो 2.0’ ह्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. सध्या चित्रपट पोस्टप्रॉडक्‍शनच्या स्थितीत असून, जानेवारी 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला हा रजनीकांतचा सुपर थरार येण्याची शक्‍यता आहे.
 
रजनीकांतच्या रोबो चित्रपटाचा पुढील भाग असणारा हा चित्रपट म्हणजे आश्‍चर्याच्या धक्‍क्‍यांनी परिपूर्ण असणार आहे. आजवर भारतीय सिनेमांत वापरण्यात न आलेले ग्राफिक्‍स या सिनेमासाठी वापरले गेले आहेत. या चित्रपटातील दृष्ये ही थेट हॉलिवूडच्या चित्रपटांतील दृष्यांइतकीच ताकदवान असणार आहेत. यामुळे चित्रपट बघण्यासाठी गेलेला प्रेक्षकाला जागतिक सिनेमाचा आनंद घेत असल्याचाच भास झाल्याशिवाय राहणार नाही.
हा चित्रपट हिंदी आणि तामीळ भाषेत बनवण्यात आला आहे. मात्र, असे असले तरीही 2.0 चित्रपटातील संवाद हा जगभरातील 20 भाषांत डब केला जाणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बदलापूर-2 मध्ये चमकणार दीपिका