Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

सिंबानंतर रॅपर बनला रणवीर सिंह

Gully boy trailer
मोठ्या स्क्रीनवर सिंबा चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकल्यानंतर बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह त्याचा सुप्रसिद्ध चित्रपट गली बॉय घेऊन आले आहे. गेल्या दिवसात चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर, आता त्याचा ट्रेलर देखील रिलीज झाला आहे. ट्रेलर दर्शकांच्या हृदयावर एक अतिशय खास प्रभाव सोडत आहे. 
 
या चित्रपटात रणवीर सिंह रॅपरची भूमिका बजावत आहे. विशेष गोष्ट म्हणजे सिम्बा चित्रपटात भ्रष्टाचारी पोलिसाची भूमिका बजावल्यानंतर रणवीर सिंहचा गली बॉय चित्रपटात गंभीर शैली देखील फार विशेष जाणवत आहे. ट्रेलरकडे पाहून सांगितले जाऊ शकते की गली बॉयची कथा मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहणार्‍या एका साध्या मुस्लिम कुटुंबातील मुलाची कथा आहे, कुटुंब आर्थिक दृष्टीने कमकुवत आहे आणि ज्याचे रॅपर बनण्याचे स्वप्न आहे.
 
चित्रपटात रणवीर सिंह व्यतिरिक्त आलिया भट्ट देखील प्रमुख भूमिकेत आहे. तिची भूमिका देखील एक मुस्लिम मुलीची आहे. यांच्या व्यतिरिक्त चित्रपटात अभिनेत्री कल्की कोचलिन देखील दिसेल. हा चित्रपट झोया अख्तर दिग्दर्शित आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऋतिक रोशनच्या बर्थडे वर Ex-वाइफ सुजैनने लिहिला हा इमोशनल मेसेज, शेयर केले PHOTO