Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रणवीर सिंह जखमी, प्रकृती ठिक

रणवीर सिंह जखमी, प्रकृती ठिक
, रविवार, 28 मे 2017 (20:47 IST)

बॉलिवूड सपरस्टार रणवीर सिंह पद्‍मावती सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाला आहे. मात्र आता त्याची प्रकृती ठिक असून तो पुन्हा ‘पद्मावती’च्या चित्रीकरणात सहभागी झाला असल्याची माहिती आहे.

संजय लीला भंसाळी यांच्या पद्मावती सिनेमात रणवीर अल्‍लाउद्‍दीन खिलजीची भूमिका साकारत आहे. सिनेमाचं शूटिंग सुरू असताना रणवीरच्या डोक्याला जखम झाली. मात्र तो शूटिंगमध्ये इतका मग्न होता की त्याला जखम झाल्याचं कळलंदेखील नाही. मात्र डोक्याला झालेल्या जखमेतून रक्त वाहू लागल्याने रणवीरला जखम झाल्याचं समजलं आणि त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुरेश आणि पद्मा वाडकर यांचे पहिल्यांदाच जुळले सूर