Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रविना टंडन ‘मातृ’चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

रविना टंडन ‘मातृ’चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
, गुरूवार, 30 मार्च 2017 (22:21 IST)
रविना टंडन ‘मातृ’ चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आगामी ‘मातृ’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. १३ वर्षानंतर चित्रपटामध्ये परतलेली रविना या चित्रपटात बलात्कार पीडित तरुणीच्या आईच्या म्हणजेच विद्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमधील झलक पाहता चित्रपटाची मांडणी भावनिक आणि अॅक्शन अशा दुहेरी रुपात केल्याचे दिसते. महिलांसाठी असुरक्षित असलेल्या देशाच्या राजधानीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या कथानकाची मांडणी केलेली असून, मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर न्याय मागण्यासाठी झगडणाऱ्या आईची व्यथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लग्नाअगोदर ह्या हिरॉईन्स होत्या प्रेग्नेंट!