Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘राझी’ वर पाकिस्तानात बंदी

‘राझी’ वर पाकिस्तानात बंदी
, गुरूवार, 10 मे 2018 (15:05 IST)

राझी’ या चित्रपटावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. राजी चित्रपटात पाकिस्तानची बदनामी करणारी दृष्ये असल्याने त्याच्यावर बंदी घातल्याचे पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने सांगितले आहे. ‘राझी’ हा चित्रपट जगभरात येत्या ११ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘राझी’ या चित्रपट हिंदुस्थानी हेर सहमतच्या आयुष्यावर आधारित असून यात आलिया भट ही सहमतच्या भूमिकेत दिसणार आहे. सहमतचे पाकिस्तानी लष्करातील सैनिकाशी लग्न होते. त्यानंतर तिचे बदलत गेलेले आयुष्य या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटात आलियासोबतच अभिनेता विक्की कोशल हा स्क्रीन शेअर करणार असून आलिया भट्टची आई सोनी राजदान देखील दिसणार आहेत.

पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने याआधी देखील अय्यारी, परि, पॅडमॅन, एजंट विनोद, एक था टायगर, टायगर झिंदा है अशा अनेक हिंदुस्थानी चित्रपटांवर बंदी घातलेली आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फनी चारोळ्या