Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

न्यूयॉर्कमध्ये जोड्यांची किंमत बघून हैराण झाले ऋषी कपूर, केलं मजेदार ट्विट

न्यूयॉर्कमध्ये जोड्यांची किंमत बघून हैराण झाले ऋषी कपूर, केलं मजेदार ट्विट
बॉलीवूड कलाकार ऋषी कपूर मागील काही महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. त्यांची पत्नी नीतू कपूर देखील त्यांच्यासबोत तेथेच आहे आणि त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती देत असते. ऋषी कपूर देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
 
अलीकडेच ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये 27 लाख किमतीचा जोडा बघून हैराण झाले. ऋषी ब्रांडेड स्नीकर स्टोअर विजिट करण्यासाठी पोहचले होते. तेथे जोड्यांची इतकी किंमत बघून ते शॉक्ड झाले.
 
ऋषी कपूनने आपल्या ट्विटर अकाउंटवर हा अनुभव शेअर करत लिहिले की न्यूयॉर्कमध्ये सर्वात मोठं स्नीकर स्टोअर, जेथे मी 12,000 हून अधिक स्टाइल आणि मॉडलचे स्नीकर्स बघितले. मी हैराण आहे की या स्नीकर्सची किंमत USD 40,000 (Rs 27,56,900), USD 27,000 (Rs 18,60,907), USD 25,000 (Rs 17,23,062) आणि USD 20,000 (Rs 13,78,450) पर्यंत आहे. सामान्यात किंमत USD 5,000 (Rs 3,44,732) किंवा याहून अधिकच आहे.
 
आपल्या दुसर्‍या ट्विटमध्ये ऋषी कपूर लिहितात, या स्नीकर्सची किंमत लक्ष देऊन बघा. मला हे ती गोष्ट जाणवतात की जोडे सोन्याचे असो वा चांदीचे, शेवटी घालायचे तर पायातच...
 
ऋषीच्या या ट्विट्सवर चाहते जमून रिअॅक्ट करत आहे. एका यूजरने लिहिले की येथे चौकात तर हे जोडे 500 किंवा 1000 मध्ये सहज मिळून जातात. तर अनेक चाहत्यांनी इतके महागडे जोडे खरेदी करू शकत नसल्याची खंत जाहीर केली.
 
अलीकडेच ऋषीच्या येणार्‍या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केले गेले आहे ज्यामुळे ऋषीच्या चाहत्यांमध्ये आनंद आणि उत्सुकता बघायला मिळाली आहे. ऋषी चित्रपट 'झूठा कहीं का' याने बॉलीवूडमध्ये कमबॅक करत आहे. हा सिनेमा 19 जुलै रोजी रिलीज होणार आहे. तसेच ऋषी कपूर या वर्षी ऑगस्टमध्ये पुन्हा भारतात येणार अशी चर्चा देखील आहे. ते स्वत: देखील भारतात येण्यासाठी आतुर झाले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'तडफड' म्हणजे नेमके काय असतं ?