Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 4 April 2025
webdunia

आगामी थ्रिलर 'ए थर्सडे'मध्ये पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार माया सराओ!

RSVP movies have now revealed Maya Sarao's look for their upcoming direct-to-digital thriller
, मंगळवार, 23 मार्च 2021 (16:36 IST)
आरएसवीपी मूव्हीजने ब्लू मंकी फिल्म्ससोबत आपल्या आगामी डायरेक्ट-टू-डिजिटल थ्रिलर, 'ए थर्सडे' मधून आता माया साराओ चा पहिला लुक प्रदर्शित केला. बेहज़ाद खंबाटा द्वारे दिग्दर्शित आणि लिखित, हा चित्रपट गुरुवारी होणाऱ्या अकल्पनीय घटनांवर आधारित आहे.  
 
माया टेलीव्हिजनवर लाईव्ह रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.  माया सराओ एका गुलाबी रंगाच्या शर्टावर स्ट्रिपड ब्लेज़र मध्ये दिसत असून शॉर्ट हेयर कट आणि चेहेऱ्यावर असलेले गंभीर हावभाव तिच्या भूमिकेतला गंभीरपणा समोर आणतात.  
 
आरएसवीपी मूव्हीजने आपल्या सोशल मीडियावर मायाचा लुक शेअर करताना लिहिले, "Reporting live on National Television, knowing that one mistake could cost her everything.
Meet the bold and fearless @mayasarao reporting live, all that happened on a #AThursday".
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RSVP Movies (@rsvpmovies)

चित्रपटात एका बुद्धिमान प्ले स्कूल टीचर, नैना जयसवालची गोष्ट सांगण्यात आली आहे जी भूमिका यामी गौतम साकारत आहे आणि ती 16 मुलांचे अपहरण करते. पहिल्यांदाच यामी एक ग्रे व्यक्तिरेखा सकारात असून, नेहा धुपिया चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.
 
या चित्ताकर्षक थ्रिलरमध्ये नेहा धूपिया, डिंपल कपाड़िया, अतुल कुलकर्णी, माया सराओ सारखे अनेक प्रतिभाशाली कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, ज्यामध्ये यामी गौतम प्रमुख भूमिकेत आहे.  ‘ए थर्सडे’चे निर्माता, रोनी स्क्रूवाला आरएसवीपीच्या अंतर्गत याची निर्मिती करणार आहेत कारण ते नेहमीच नव्या संहिता आणि प्रतिभेच्या शोधात असतात.  
 
आरएसवीपी आणि ब्लू मंकी फिल्म्स द्वारे निर्मित ‘ए थर्सडे’, 2021 मध्ये डिजिटल माध्यमात प्रदर्शित होणार आहे ज्याचे चित्रीकरण नुकतेच सुरु झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'खिसा'च्या खिशात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार