प्रसिद्ध चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा हिला मुंबई उच्च न्यायालयाने सहा महिन्यांचा कारावास ठोठावला आहे. न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत प्रेरणाला गजाआड करण्यात येणार आहे. कारावासात पाठवण्यासाठी आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण करण्याचे आदेश कोर्टाने दिले.
प्रेरणा अरोराने ‘रुस्तम’, ‘पॅडमॅन, ‘टॉयलेट – एक प्रेमकथा’ यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘गॉथिक एंटरटेनमेंट’ कंपनीने ‘क्रिअर्स एंटरटेनमेंट’च्या प्रमुख प्रेरणा अरोरा-प्रोतिमा अरोरा यांच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर कोर्टाने कारवाई सुरु केली होती. कोर्टासमोर झालेल्या तडजोडीनुसार ‘क्रिअर्स एंटरटेनमेंट’ प्रॉडक्शन हाऊसच्या वतीने ‘गॉथिक एंटरटेनमेंट’ला 25 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचं ठरलं होतं. मात्र ‘क्रिअर्स एंटरटेनमेंट’ अडीच कोटींचे दोन हप्ते भरण्यातही अपयशी ठरलं. चेक बाऊन्स झाल्यामुळे ‘गॉथिक’ने उच्च न्यायालयात धाव घेतली.