Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘सेक्रेड गेम्स 2' च्या चित्रीकरणाला सुरूवात

sacred games  2
, मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 (19:38 IST)
नेटफ्लिक्सवरची सर्वात गाजलेली वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनच्या चित्रीकरणाला अखेर मुंबईत सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सैफ या सीरिजच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तुर्त तरी सैफवर आधारित दृश्य मुंबईत चित्रीत करण्यात येत आहे. त्यानंतर इतर कलाकारांसोबत चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.
 
विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कांदबरीवर आधारित ही वेब सीरिज आहे. या वेब सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीनं साकारलेली गणेश गायतोंडेची भूमिका प्रेक्षकांनी उचलून धरली. ‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ म्हणणाऱ्या गणेश गायतोंडेचे यासारखे अनेक संवाद सोशल मीडियावर हिट ठरले. शिवीगाळ, खून मारामारी, अश्लिल संवाद आणि दृश्यानं भरलेली ही वेब सीरिज जितकी वादाच्या भोवऱ्यात सापडली तितकीच ती प्रसिद्धही झाली होती. मी टु मोहिमेचा फटका सेक्रेड गेम्सलाही बसला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शुभ दिपावली