वाढदिवसानिमित्त सैफच्या ‘लाल कप्तान’चा टीजर रिलीज

शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019 (16:30 IST)
बॉलीवूड अभिनेता आणि नवाब सैफ अली खान हा आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. सैफने वाढदिवसानिमित्त बुधवारी रात्री त्याने लंडन येथे मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. वाढदिवसानिमित्त सध्या सोशल मीडियावर व्हायरल त्याला फॅन्सकडून शुभेच्छा दिल्या जात आहे. त्याबरोबरीने सेक्रेड गेम्स’मध्ये ‘सरताज सिंग’ची दमदार भूमिका साकारणाऱ्याबाबत कौतुकही केले जात आहे.
 
बॉलिवूड अॅक्टर सैफ अली खान त्याच्या आगामी चित्रपटात नागा साधूची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि त्याच्या या चित्रपटाचे नाव आहे ‘लाल कप्तान’. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये ‘सरताज सिंग’ची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याच्या वाट्याला आणखी एक दमदार भूमिका आली असून, प्रेक्षकांमध्येही आतापासूनच त्याविषयीची बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख नेहा शितोळे सोशल मीडियावर झाली ट्रेंड !