अभिनेत्री रिंकू राजगुरू आता एका हिंदी वेब सीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसिरीज पहिलं पोस्टर आणि ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. ‘हंड्रेड’ असं या वेबसिरीजच नाव आहे. रिंकूसोबत बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता देखील असणार आहे. येत्या २५ एप्रिलपासून ही वेबसिरीज प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
लारा आणि रिंकू यांच्यासोबत रोहिणी हट्टंगडी, अरुण नलावडे ,मकरंद देशपांडे सुधांशू पांडे. परमीत सेठी, करण वाही असे अनेक कलाकार या सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘दो खिलाडी, प्रोब्लेम भारी’ अशी या वेबसिरीजची टॅगलाईन आहे.
नेहमीप्रमाणेच रिंकूचा बिनधास्त अंदाज बघायला मिळणार आहे. चाळीत राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबामधल्या एका मुलीची तिची भूमिका आहे. रिंकूची ही पहिलीच वेब सीरिज असेल.