बॉलीवूड दबंग अभिनेता सलमान खान याचा डुप्लीकेट म्हणजे लुक अलाईक पाकिस्तानमध्ये असून सध्या हा फारच लोकप्रिय होत आहे. अनेक मुली त्यासोबत सेल्फी घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत तसेच चित्रपट व जाहिरात क्षेत्राकडूनही त्याला मोठ्या ऑफर्स मिळू लागल्या आहेत.
सलमानच्या या डुप्लीकेटचे नाव आहे हुसनेन सलीम. तो इस्लामाबाद येथे एक डिपार्टमेंट स्टोअर्स चालवितो व या दुकानात नेहमीच खूप गर्दी असते. अर्थातच ही गर्दी हुसनेनसाठीच असते व त्याला सुरक्षा गार्ड नेमण्याची वेळ आली आहे.
सियालकोटमध्ये 85 साली जन्मलेला हुसनेन सलमानपेक्षा तब्बल 20 वर्षांनी तरुण आहे. विशेष म्हणजे सलमानची व त्याची रासही एकच आहे व दोघांच्याही वडिलांचे नाव सलीम आहे.
हुसनेन सांगतो सलमानचा मैनें प्यार किया प्रसिद्ध झाला तेव्हा तो शाळेत होता. मात्र तेव्हाच सलमान व माझ्यातील साम्य घरच्यांच्या लक्षात येऊ लागले होते. कॉलेजात तर सलमानसारखा दिसतो म्हणून माझी प्रसिद्धी होती.
सलमानसारखीच डांस कौशल्ये व मिमिक्री करण्याची कला हुसनेनकडे आहे व दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढत चालली आहे.