Publish Date: Sat, 01 Oct 2022 (15:02 IST)
Updated Date: Sat, 01 Oct 2022 (15:06 IST)
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानाच्या जवळीक आणि त्याच्या बॉडी डबल सागर पांडे यांचं निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिममध्ये व्यायाम करत असताना सागरला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.
सागर पांडे हा सलमानचा बॉडी डबल म्हणून अभिनयासाठी इंडस्ट्रीत ओळखला जायचा. शुक्रवारी जिममध्ये व्यायाम करत असताना सागरच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने तो जमिनीवर पडला. यानंतर उपस्थित लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सलमान खाननेही सागर पांडे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सागरसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर करत त्याने लिहिले की, 'माझ्यासोबत असल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भाई सागर, तुझ्या आत्म्याला शांती लाभो.'
सागर पांडेचे वय 40-45 च्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. तो सलमान खानसोबत जवळपास 50 चित्रपटांमध्ये दिसला आहे. बजरंगी भाईजान, ट्यूबलाइट, प्रेम रतन धन पायो, दबंग, दबंग 3 यांसारख्या चित्रपटांमध्ये सागर सलमानचा बॉडी डबल बनला आहे.