rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलमानचा चर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट लूक रिलीज

salman khan
, शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (00:51 IST)
अभिनेता सलमान खान, अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला असून्, निर्माता अतुल अग्निहोत्री याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे पोस्टर दाखवले आहे. ‘भारत’च्या पहिल्या पोस्टरमध्ये सलमान, कतरिना वाघा-अटारी बॉर्डरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे आहेत. चित्रपटातील कतरिनाचा लूक हा आतापर्यंतचा वेगळा लूक असल्याचे दिसतय. तिने साडी नेसली असून केस देखील कुरळे आहेत. सलमान आणि कतरिनाचा चित्रपटातील हा फर्स्ट लूक बघूनच त्यांच्या चाहत्यांची उत्सुकतता वाढली आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित भारत या चित्रपटात सलमान कतरिना व दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत. सुरुवातीला या चित्रपटात कतरिनाच्या जागी प्रियंका चोप्राची वर्णी लागली होती. मात्र प्रियंकाने शूटींग सुरू व्हायच्या काही दिवस आधीच चित्रपटातून माघार घेतली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कलाकारांच्या यशावर ठरते मानधन