Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 9 April 2025
webdunia

सलमान नाही करणार कॅटरीनाला किस

bollywood news
सलमान खानच्या इच्छेविरुद्ध कोणीही त्याच्याकडून काहीही करवू शकत नाही कारण तो कोणाचेही ऐकायला तयार नसतो. हे तर सर्वांना माहीत आहे की सलमानने सिनेमात कोणत्याही नायिकेला लिप ‍लॉक केलेले नाही. सलमानप्रमाणे त्याचा चित्रपट बघायला लोकं कुटुंबासह येतात, त्यांच्यासोबत मुलंही येतात अशात किसिंग सीनमुळे लज्जास्पद स्थिती व्हायला नको याची काळजी घेणे आवश्यक आहे. कुटुंबासह चित्रपट बघू शकतील सलमानला असेच चित्रपट करायला आवडतं.
 
यासोबतच सलमानप्रमाणे तो युनिटसमोर शूटिंग दरम्यान कसं नायिकेला किस करू शकतो? तो असे दृश्य करण्यात सहज नसतो. त्याला पब्लिक प्लेसवर गर्लफ्रेंडचा हात धरणेही पसंत नाही. म्हणून तो असे सीन करत नाही.
 
सर्व दिग्दर्शकांना हे माहीत आहे की सलमान नो किसिंग सीन पॉलिसीवर काम करतो अशात त्याकडून असे दृश्य करवणे अशक्यच आहे परंतू टाइगर जिंदा है च्या दिग्दर्शक अली अब्बास जफर ने काही वेगळं म्हणून सलमान- कॅटरीनावर किसिंग सीन शूट करावं असे ठरवले.
 
लोकांनी जफरला समजवण्याचा प्रयत्न केला की सलमानला या गोष्टीसाठी तयार करणे कठिण आहे पण सुल्तान हिट झाली म्हणून सलमान होकार देईल असे त्यांना वाटत होते. शेवटी सलमानने जफरला स्पष्ट सांगितले... नो अर्थात नाहीच...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'जूली 2' मध्ये मी खूपच अश्लील सीन केला आहे: राय लक्ष्मी