अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर हिने सलमान खानचा ‘दबंग ३’ चित्रपटद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामुळे सईला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आता सई पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटी येत आहे. आणि सलमानने तिचा व्हिडिओ शेअर केला आहे.
सलमान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला असून यात सई सलमानच्या मेहुण्या म्हणजे आयुष शर्मा सोबत दिसत आहे. यात सई एका वेग्ळया अंदाजमध्ये दिसत असून हा एक नवा म्यूझिक व्हिडीओ आहे. ‘मांझा’ असे या म्यूझिक व्हिडीओचे नाव आहे.
मांझा यावरुनच पतंग उडवित असल्याचे गाण असल्याचा अंदाज अगदी बरोबर आहे. हे गाणे विशाल मिश्रा आणि अक्षय त्रिपाठीने लिहिले आहे. गाण्यातील सई आणि आयुषची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. सईचे वडील महेश मांजरेकर हे सलमानचे खास मित्र आहे आणि सईला लाँच करण्याचा निर्णय देखील सलमान खानने घेतला होता असा खुलासा महेश मांजेरकरांनी केला होता.