14 एप्रिल रोजी सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास करण्यात पोलीस व्यस्त आहेत. मुंबई गुन्हे शाखेला आणखी एक यश मिळाले आहे.
याप्रकरणी सहाव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला हरियाणातून अटक केली असून, हरपाल सिंग (37) असे त्याचे नाव आहे.या प्रकरणातील आरोपीला हरियाणातील फतेहाबाद येथून अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबईतील मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
हरपालने मोहम्मद रफिक चौधरीला सलमान खानच्या घराची फेरफटका मारण्यासाठी पैसे दिले होते. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी या प्रकरणातील पाचवा आरोपी मोहम्मद चौधरी याला राजस्थानमधून अटक केली होती
या प्रकरणी पोलिसांनी प्रथम गुजरातमधील कच्छ येथून दोन आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे . यानंतर पंजाबमधून दोन आरोपींना अटक करण्यात आली. पाचव्या आरोपीला राजस्थानमधून अटक केल्यानंतर आता सहाव्या आरोपीला हरियाणामधून अटक करण्यात आली आहे.गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई हे गोळीबार प्रकरणातील आरोपी आहेत.