Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलमान खानचे साऊथच्या चित्रपटात पदार्पण, चिरंजीवीच्या गॉडफादर मध्ये दिसणार

सलमान खानचे साऊथच्या चित्रपटात पदार्पण, चिरंजीवीच्या गॉडफादर मध्ये दिसणार
, बुधवार, 16 मार्च 2022 (16:33 IST)
बॉलिवूडनंतर सलमान खान आता साऊथच्या चित्रपटांमध्ये हात आजमावणार आहे. सलमान खान आता साऊथ चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. सलमान खान चिरंजीवीच्या गॉडफादर चित्रपटात दिसणार आहे. चिरंजीवी हे देखील दक्षिणेतील मोठे नाव आहे. अशा परिस्थितीत दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केल्यावर चाहत्यांच्या अत्यंत आनंद झाला आहे.
 
चिरंजीवीने सलमानचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. हा फोटो शेअर करत चिरंजीवीने ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, 'ब्रदर गॉडफादरमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमच्या एंट्रीने सर्वांनाच उत्साह तर दिलाच पण प्रत्येकाच्या उत्साहाची पातळी आणखी वाढली आहे. तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करताना आनंद होत आहे. तुमची उपस्थिती प्रेक्षकांना एक जादुई किक देईल.
 
सलमान खान या चित्रपटात असल्याच्या वृत्तामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हा मल्याळम सुपरहिट चित्रपट 'लुसिफर'चा रिमेक असेल. या चित्रपटात सलमान खान एक छोटीशी भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन सारखीच भूमिका सलमान खान करणार आहे. 'गॉडफादर' हा व्यावसायिक मनोरंजन करणारा आहे. मोहन राजा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
 
नयनतारा, सत्यदेव कांचन, जय प्रकाश यांसारखे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. सलमानबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच 'पठाण', 'कभी ईद कभी दिवाळी' आणि 'टायगर 3' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'द कश्मीर फाईल्स: विवेक अग्निहोत्रींच्या चित्रपटावरून वाद का निर्माण झालाय?