Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलमान खान लॉरेन्स बिश्नोईपुढे झुकणार नाही, माफी मागणार नाही-वडील सलीम खान

Salman
, शनिवार, 19 ऑक्टोबर 2024 (11:25 IST)
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी सलमान खानचे कनेक्शन आणि लॉरेन्स बिश्नोईकडून मिळणाऱ्या धमक्यांवर आता वडील सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेची चिंता वाढली असून लॉरेन्स बिश्नोईने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. त्याचवेळी सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या. आता सुपरस्टारचे वडील आणि पटकथा लेखक सलीम खान सांगितले की, बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांच्या हत्येचा काहीही संबंध नाही, असे त्यांचे मत आहे.
 
तसेच राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची सलमान खानशी मैत्री असल्याने त्यांची हत्या झाली का, असे विचारले असता ते म्हणाले की, आमच्या कुटुंबीयांना सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये कोणताही संबंध दिसत नाही. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी लॉरेन्स बिश्नोईचा काहीतरी संबंध असल्याचे कुटुंबीयांचे मत आहे. याचा सलमानशी काहीही संबंध नाही.
 
सलमान खान माफी मागणार नाही, असे वडील सलीम खान म्हणाले आहे. कारण त्याने कधीही प्राण्यांची शिकार केलेली नाही. सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब त्रस्त आहे. सलीम खान म्हणाले की, सलमानने कधीही कोणत्याही प्राण्याची हत्या केली नाही. त्यामुळे सलमान खान लॉरेन्स बिश्नोईपुढे झुकणार नाही, माफी मागणार नाही असे देखील ते म्हणाले.   
 
तसेच माहिती समोर आली आहे की, कडक सुरक्षेदरम्यान सलमान खानने बिग बॉस 18 च्या वीकेंडचे शूटिंग केले आहे, ज्याचा प्रोमो व्हायरल होत आहे आणि चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Diwali Lakshmi Pujan : दिवाळीला मुंबईतील प्रसिद्ध देवी लक्ष्मीच्या 3 मंदिरांना भेट द्या.