Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जबरा फॅन, संजू बाबाच्या नावावर केली कोट्यावधीची संपत्ती

sanjay datta
, बुधवार, 7 मार्च 2018 (16:33 IST)
अभिनेता संजय दत्तच्या एका चाहतीने चक्क कोट्यवधी रूपयांची संपत्ती संजय दत्तच्या नावावर केली आहे. निशी हरिश्चंद्र त्रिपाठी असे या चाहतीचे नाव आहे. निशी त्रिपाठीने मृत्यूपूर्वी आपली सर्व संपत्ती (बॅंक अकाऊंट्स, सर्व पैसा आणि बॅंकेतील लॉकरही) संजय दत्तच्या नावे केली आहे. धक्कादायक असे की, या सर्व प्रकाराची अभिनेता संजय दत्त याला कोणतीच कल्पना नव्हती.
 

तिच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीबाबत जेव्हा खुलासा पुढे आला तेव्हा तिच्या कुटुंबियांनाही धक्का बसला. सदर प्रकरण आर्थिक आणि बॅंकेशी संबंधीत असल्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. 

दरम्यान, अभिनेता संजय दत्तचे वकील सुभाष जाधव यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधीत संपत्तीतील काहीही आपणास नको आहे. निशी त्रिपाठी यांचे १५ जानेवरी २०१८ला प्रदीर्घ अजाराने निधन झाले. ती आपली ८० वर्षी आई, मुले अरूण, आशीष आणि मुलगी मधुसोबत राहात होती. या कुटुंबाकडे १० कोटी रूपयांहून अधिक किमतीचा ३ बीएचकेचा फ्लॅट मलबार हिल येथे आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिलदार टायगर श्रॉफचा अनोखा दोस्ताना