Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘भूमी’ चे पोस्टर प्रदर्शित

‘भूमी’ चे पोस्टर प्रदर्शित
, सोमवार, 31 जुलै 2017 (08:46 IST)

‘भूमी’ या चित्रपटातून संजय दत्त बॉलिवूडमध्ये कमबॅक करतआहे. या चित्रपटाचा पोस्टर शनिवारी प्रदर्शित झाला. उमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटात संजूबाबा कारागृहातून सुटल्यानंतर पहिल्यांदाच पडद्यावर भूमिका साकारणार आहे. आधीच्या पोस्टरमध्ये त्याचा पूर्ण चेहरा दाखवण्यात आला नव्हता. मात्र या दुसऱ्या पोस्टरमध्ये रक्ताने माखलेला संजय दत्तचा पूर्ण चेहरा पाहायला मिळतोय. या पोस्टरमध्ये संजय दत्तची भेदक नजर विशेष लक्ष वेधून घेते. यावर्षी २२ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात संजूबाबा एका मुलीच्या पित्याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात संजयसोबत आदिती राव हैदरी स्क्रीन शेअर करणार आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी विनोद : "उबाका बस्की"