संजय दत्त आणि अरशद वारसी यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. सुपरहिट प्रेंचाइजी मुन्ना भाईच्या या जोडीच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. लवकरच प्रेक्षकांना मुन्ना आणि सर्किटची ही जोडी मोठय़ा पडद्यावर पहायला मिळणार आहे.
अरशद वारसी आणि संजय दत्त यांच्या आगामी चित्रपटाचे एक पोस्टर शेअर करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये मुन्ना आणि सर्किट दोघेही कैद्याच्या वेशात दिसून येत आहेत. या चित्रपटाच्या शीर्षकाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाची निर्मिती संजय दत्त करणार आहे. तर याचे दिग्दर्शन सिद्धांत सचदेवकडून केले जाणार आहे. हा चित्रपट चालूवर्षीच प्रदर्शित होणार आहे.
हे दोन्ही कलाकार यापूर्वी 2007 मध्ये प्रदर्शित धमाल चित्रपटात दिसून आले होते. अशा स्थितीत सुमारे 16 वर्षांनी दोघेही पुन्हा एकत्र दिसून येणार आहेत. संजय दत्त आणि अरशद यांची जोडी राजकुमार हिरानी यांची सुपरहिट प्रेंचाइजी मुन्नाभाईमध्ये झळकली होती. 2003 मध्ये प्रदर्शित मुन्नाभाई एमबीबीएस आणि 2006 मध्ये प्रदर्शित लगे रहो मुन्ना भाईने प्रेक्षकांचे मोठे मनोरंजन केले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor