Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आई नर्गिसच्या बर्थ एनिवर्सरीवर भावुक झाले संजय दत्त

Sanjay Dutt
, शनिवार, 1 जून 2024 (15:36 IST)
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि अदाकारा नर्गिस यांची 1 जुना ला बर्थ एनिवर्सरी आहे. नर्गिस यांनी आपल्या अभिनयाने संपूर्ण जगावर भुरळ टाकली होती. अभिनेता संजय दत्त आपल्या आईच्या खूप जवळ होते. त्यांच्या जीवनातील प्रत्येक छोटी मोठी गोष्ट ते आई सोबत शेयर करायचे. 
 
आई नर्गिसच्या बर्थ एनिवर्सरीवर संजय दत्त यांनी काही फोटोज शेयर केलेत. या या फोटोंसोबत संजय दत्त यांनी लिहले की, 'हॅंपी बर्थडे माँ' मी प्रत्येक दिवशी, प्रत्येक मिनिटाला, सेकंदाला तुला मिस करतो. काश ! तू माझ्या सोबत असतीस. तर मला जगावे कसे शिकवले असते जसे तुला आवडायचे. मला आशा आहे की मला पाहून तुला अभिमान वाटत असेल. लव्ह यु माँ.  
 
प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस यांचा जन्म 1 जून 1929 ला झाला होता. त्यांचे  खरे नाव फातिमा रशीद होते. नर्गिस यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद उत्तमचंद त्यागी होते. नंतर त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. नर्गिस यांनी सुनील दत्त सोबत लग्न केले होते. नर्गिस यांचे निधन 3 मे 1981 मध्ये कँसरमुळे झाले. 

Edited By- Dhanashri Naik    

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सलमान वर परत हल्ला करण्याचे कारस्थान