Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजपूत समाजातर्फे भन्साळी यांचा निषेध

राजपूत समाजातर्फे भन्साळी यांचा निषेध
औरंगाबाद- महाराणी पद्मीनी या राजपूत समाजासाठी व विशेषत: राजपूत महिलांसाठी अत्यंत स्वाभिमानी व मानाच्या आजही प्रतीक आहेत. त्यांनी तत्कालीन स्त्रियांच्या पावित्र्यासाठी सोळा हजार राजपूत स्त्रियांसह धगधगत्या अग्रीत उडी घेऊन जोहर केला होता. तेराव्या शतकातील या महाराणीच्या बलिदानाच्या पवित्रमय चरित्रात सिने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी छेडछाड करून पद्मावती नावाचा चित्रपट काढीत आहेत.
 
राजस्थानातील त्याच्या या कृतीचा वैजापूर राजपूत समाजाने राजपूत समाज मढी येथे, निदर्शने करून व जाहीर निषेदाच्या घोषणा देऊन तीव्र शब्दात जाहीर निषेध केला. अनावश्यक रीतीने महाराणी पद्मिणीच्या जीवन चरित्रात कल्पकतेने अनावश्यक बदल करून ते विकृत स्वरूपात चित्रित करण्याची भन्साळीची कृतीने संपूर्ण राजपूत समाजात संतापाची लाट उसळी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सलमानचे या पुरुषासोबत आहे शारीरिक संबंध!