सारा अली खान ही बॉलिवूडमधील उगवत्या अभिनेत्रींपैकी एक आहे. फार कमी वेळात या अभिनेत्रीने इंडस्ट्रीत एक चांगली नायिका म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. लहान वयातच सारा लाखो लोकांची लाडकी बनली आहे. आज ही अभिनेत्री तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. या अभिनेत्रीचा जन्म 12 ऑगस्ट 1995 रोजी मुंबईत झाला. ती ज्येष्ठ अभिनेते सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंग 2004 मध्ये वेगळे झाले आणि साराची काळजी तिची आई अभिनेत्री अमृता यांनी घेतली.
साराने चित्रपटात येण्यापूर्वी तिचे शिक्षण पूर्ण केले तिने मुंबईतील बेझंट मॉंटेसरी शाळेतून शिक्षण घेतले नंतर उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली आणि कोलंबिया विद्यापीठातून पदवी मिळवली.
साराने 2018 मध्ये केदारनाथ चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात तिच्या सोबत मुख्य भूमीकेत दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत दिसला. या चित्रपटासाठी तिला बेस्ट फिमेल डेब्यूचा पुरस्कार मिळाला. नंतर ती रणवीरसिंग सोबत सिम्बा , व्हे लव्ह आजकल, अतरंगी रे, कुली नंबर 1, जरा हटके जरा बचके, गॅस लाईट, मर्डर मुबारक आणि रॉकी आणि रानी ची प्रेम कहाणी या चित्रपटात झळकली.अलीकडेच ती ए मेरे वतन के लोगो चित्रपटात दिसली. आता ती अक्षय कुमारच्या स्कायफोर्स आणि मेट्रो दिस डेज चित्रपटात दिसणार आहे.
ती स्वतः करोडो रुपयांची मालक आहे. अनेक बड्या स्टार्ससोबत त्यांनी अनेक हिट चित्रपट केले आहेत. ती तरुण वयात लक्झरी लाइफ जगते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती 41 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे.