सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खानने खूप कमी वयात फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. साराने आतापर्यंत केवळ दोन चित्रपट केले असली तरी ट्रेंड्समध्ये सामील असते. हल्ली ती लव आजकल 2 आणि कूली नंबर वन च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
साराची आपल्या वडील सैफसोबत चांगली बॉन्डिंग दिसून येते. सैफ आणि अमृता सोबत नसले तरी सैफ सारा आणि इब्राहिम दोघांकडे लक्ष देतात. या व्यतिरिक्त साराला करीना कपूरसोबत देखील बघितले गेले आहे. यामुळे त्यांच्या चांगलं नातं असल्याचं कळून येतं.
अलीकडेच साराने आपल्या कुटुंब आणि पर्सनल लाईफबद्दल मनमोकळेपणाने बोलत सांगितले. तिला विचारले गेले की काय करीना आणि तू आपसात बोलता? तर यावर तिने म्हटले की मला वाटतं करीना माझी मैत्रीण आहे परंतू याहून अधिक ती माझ्या वडिलांची बायको आहे.
साराने म्हटले की माझ्या मनात तिच्यासाठी सन्मान आहे आणि ती माझ्या वडिलांना आनंदी ठेवते याची मला जाणीव आहे. आम्ही समान इंडस्ट्रीचे असल्यामुळे आमच्यात कामासंबंधी चर्चा होते. साराने तैमूरला मिळत असलेल्या मीडिया अटेन्शनमुळे सैफ परेशान होतात असे देखील सांगितले.
सारा अनेकदा आपल्या वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जात असते. प्रत्येक सणाला ती सैफ-करीनाला भेटते. आणि करिअर आणि फॅशनसंबंधी सल्ला देखील ती करीनाकडून घेत असते.