Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

13व्या वर्षात स्वतपेक्षा 30 वर्ष मोठ्या व्यक्तीशी लग्न झाले होते सरोज खानचे, 14व्या वर्षात आई बनली

13व्या वर्षात स्वतपेक्षा 30 वर्ष मोठ्या व्यक्तीशी लग्न झाले होते सरोज खानचे, 14व्या वर्षात आई बनली
मुंबई , बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 (14:16 IST)
2000पेक्षा जास्त गाण्यांचे कोरियोग्राफर करून चुकलेली सरोज खान 68 वर्षांची झाली आहे. 22 नवंबर, 1948रोजी किशनचंद सद्धू सिंह आणि नोनी ​सद्धू सिंह यांच्या घरात जन्माला आलेली सरोजचे वास्तविक नाव निर्मला किशनचंद्र संधु सिंह नागपाल आहे. पार्टिशनानंतर सरोजचा परिवार पाकिस्तानातून भारतात आला होता. फक्त 3 वर्षाच्या वयात बाल कलाकार म्हणून सरोजने आपल्या करियरची सुरुवात 'नजराना' चित्रपटापासून केली होती.  
 
13वर्षाच्या वयात जेव्हा अचानक झाले सरोजचे लग्न ...
सरोज खानने 13 वर्षाच्या वयात इस्लाम कबूल करून 43 वर्षाचे डांस मास्टर बी सोहनलालशी लग्न केले होते. सरोजच्या वयाशी किमान   30 वर्ष मोठे सोहनलाल यांचे दुसरे लग्न होते. ते आधीपण चार मुलांचे वडील होते. एका मुलाखतीत सरोजने सांगितले होते की 13 वर्षाच्या वयात ती शाळेत जात होती आणि लग्न काय हे तिला माहीतच नव्हते. एका दिवशी तिचे डांस मास्टर सोहनलालने तिच्या गळ्यात काळा दोरा बांधला होता, असे केल्याने सरोजला वाटले की तिचे लग्न झाले आहे.  
 
पतिने लपवले होते की त्याने लग्न झाले आहे ...
शाळेत जाण्याच्या वयात सरोजने सोहनलालशी लग्न केले होते. त्यावेळेस तिला माहित नव्हते की सोहनलाचे आधीपासूनच लग्न झालेले आहे आणि चार मुलांचा बाप ही आहे. ही माहिती सरोजला त्याच्या पहिल्या बायकोकडून 1963मध्ये मिळाली, जेव्हा तिचा मुलगा राजू खानचा जन्म झाला होता. 1965मध्ये तिच्या दुसर्‍या मुलाने जन्म घेतला होता, तो 8 महिन्यानंतर मरण पावला. जेव्हा सोहनलालने सरोजच्या दोन्ही मुलांना आपले नाव देण्यास नकार दिला, त्यानंतर ते दोघे वेळगे झाले. काही वर्षांनंतर सोहनलालला हार्ट अटॅक आला, तेव्हा त्याच्याशी सरोजची नजीकी वाढली. या दरम्यान ती त्याच्या जवळ आली आणि सरोजने कुकु (मुलगी)ला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर सोहनलाल, सरोजच्या जीवनातून असा गायब झाला की नंतर कधीच दिसला नाही आणि सरोजने दोन्ही मुलांचे एकटीनेच लालन पालन केले.  
 
webdunia
सरोजचे ही दोन लग्न झाले आहे  
सोहनलालशी वेगळी झाल्यानंतर सरोजने सरदार रोशन खानशी लग्न केले. सरदार रोशन आणि सरोजची एक मुलगी आहे सुखना खान, जी सध्या दुबईमध्ये डांस इंस्टिट्यूट चालवते.  
 
आता सरोज जवळ कामाचा तोटा
भले सरोजने 2000पेक्षा जास्त गाण्यांचे कोरियोग्राफ केले आहे. पण आता तिच्याजवळ कामाची कमी आहे. वर्ष भरात ती एकाध चित्रपटाची कोरियोग्राफी करू शकते. तिचे शेवटचे चित्रपट तनु वेड्स मनु रिटर्न्स (2015) होते, याअगोदर तिनी माधुरी दीक्षितचे 2014मध्ये आलेले चित्रपट 'गुलाब गैंग'मध्ये काम केले होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चाकणचा किल्ला