rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सतीश कौशिक यांनी तब्बल 25 किलो वजन घटविले

satish kaushik
, मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018 (17:08 IST)

बॉलिवूडमधील अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी तब्बल 25 किलो वजन घटविले आहे. वजन घटवल्यानंतरचे सतीश कौशिक यांचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याआधी वाढत्या वजनामुळे चालणं-फिरणं अगदीच कठीण झाले होते.  विशेष म्हणजे व्यायाम किंवा कोणत्याही कसरतीविना त्यांनी आपले 25 किलो वजन घटवलं आहे. 

वजन घटवण्यासाठी सतीश कौशिक यांनी अमेरिकेतील डॉक्टर क्रिश्चियशन मिडिलटन यांची मदत घेतली होती. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार सतीश यांनी chirothin औषधाचं सेवन केले होते. या औषधाच्या सात थेंबांचं ते नियमित सात तासांमध्ये सेवन त्यांनी केले. यानंतर सुरुवातीचे दोन दिवस त्यांनी पाच हजार कॅलरीचा खुराक  घेतला. तिस-या दिवसापासून 39 दिवसापर्यंत त्यांनी औषधाचे पाच थेंब घेण्यास सुरुवात केली. सकाळच्या न्याहरीमध्ये ते बिनसाखरेचा चहा प्यायचे. यानंतर दिवसात 100 ते 120 ग्रॅम प्रोटीन्स  ( चिकन, चीज ) आणि 100 ग्रॅम भाज्या खायचे. शाकाहारात ब्रोकलीचे प्रमाण सर्वाधिक असायचे. शिवाय आहारात सफरचंदाचाही समावेश असायचा.  दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात जवळपास 14 ते 16 तासांचे अंतर असायचे, भूक लागली तर कच्च्या भाज्या खायचो, असे सतीश यांनी सांगितले. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

... म्हणून बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीनची निवड