Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना डेंग्यू, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

webdunia
गुरूवार, 10 ऑक्टोबर 2019 (10:03 IST)
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना  मुंबईतील खार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी धर्मेंद्र हे मुलगा सनी देओलसोबत घरी परतले. गेल्या आठवड्यात त्यांना डेंग्यूची लागण झाली होती. सध्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
धर्मेंद्र हे रुग्णालयातून डिस्चार्च मिळवून लोणावळा येथील फार्महाऊसवर जाणार असल्याचीही चर्चा होती. ते तिथल्या घरी आराम करून तब्येत बरी झाल्यावर मुंबईला परतणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र ते सध्या मुंबईतल्यात घरी आराम करणार आहेत.
 
धर्मेंद्र यांनी १९६० साली ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. ५० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास २०० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

तब्बल चार वर्षांनी ‘डॅडी’ आले दगडी चाळीत