बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरूख खान कॅनडामध्ये टेड टॉक्स (TED - Technology, Entertainment and Design Talks) या कॉन्फरन्समध्ये सहभागी होणार असून हा मान मिळवणारा तो बॉलीवूडमधला पहिला कलाकार ठरला आहे. कॅनडामध्ये दरवर्षी हे संमेलन भरते आणि त्यामध्ये भविष्य कसं असेल याबद्दल तज्ज्ञ आपली मतं व्यक्त करतात.
टेड टॉक्स हे अत्यंत प्रतिष्ठेचं व्यासपीठ मानलं जातं. या आधी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, गुगलचे संस्थापक सर्जी बिन व लॅरी पेज अशा दिग्गजांनी टेड टॉक्समध्ये आपले विचार मांडले आहेत.