Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Shahrukh Khan: शाहरुख खानने शर्टलेस फोटो शेअर केला, चाहत्यांना 'पठाण' चित्रपटाची उत्सुकता वाढली

Shahrukh Khan: शाहरुख खानने शर्टलेस फोटो शेअर केला, चाहत्यांना 'पठाण' चित्रपटाची उत्सुकता वाढली
, सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (11:22 IST)
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'झिरो' चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. याशिवाय त्याने 'नंबी: द रॉकेट्री' आणि 'ब्रह्मास्त्र'मध्ये कॅमिओ करून चाहत्यांना खूश केले आहे. पण शाहरुख लवकरच त्याच्या 'पठाण' या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धमाल करत मुख्य अभिनेता म्हणून झळकणार आहे. या सगळ्यामध्ये शाहरुख खानने स्वतःचा एक फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे, त्याने शेअर केलेल्या फोटो मध्ये तो शर्टलेस होऊन बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे.  
 
 
शाहरुख खानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये किंग खान त्याच्या 'पठाण' चित्रपटातील लूकमध्ये दिसत आहे. शाहरुख शर्टलेस असून दोन्ही हात दुमडून  सोफ्यावर बसला असून त्याने आपला अर्धा चेहरा हाताने लपवला आहे. या छायाचित्रात शाहरुखचे लांब केस आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

 
या फोटोसोबत शाहरुख खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आज मी माझ्या शर्टला म्हणतोय... तू असती तर तसं झालं असतं ,तूला आश्चर्य वाटलं असत , तू हसली असती. तू असतीस तर असं झालं असतं... 'मी पण पठाणची वाट बघतोय.' 
 
शाहरुखचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. इतकंच नाही तर अभिनेत्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांना 'पठाण' चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. या पोस्टवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, 'ऑल द बेस्ट सर फॉर पठाण.' एका यूजरने 'लव्ह यू खान सर, एका युजर्स ने लिहिले, 'आता पठाण साठी अजून थांबू शकत नाही, आम्ही  तुझ्यावर प्रेम करतो.'
 
शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट पुढील वर्षी 25 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शाहरुखचा हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. 'पठाण' व्यतिरिक्त शाहरुख खान 'जवान' आणि 'डंकी' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी जोक -नवऱ्याचे मित्र