Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी उर्फ नर्गिस रबाडी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी उर्फ नर्गिस रबाडी यांचे निधन
, मंगळवार, 6 मार्च 2018 (17:03 IST)

अभिनेत्री शम्मी उर्फ नर्गिस रबाडी यांचे आज पहाटे मुंबई येथे निधन झाले. हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्ण काळातील सुमारे दोनशे चित्रपटांतून शम्मी यांनी अभिनय केला. त्यांचा जन्म २४ एप्रिल १९२९ मध्ये गुजरात राज्यातील पारशी कुटुंबात झाला. मल्हार', 'संगदिल', 'पहली झलक', 'कंगन', 'बंदिश', 'आझाद', 'दिल अपना और प्रीत पराई'... अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका रसिकांच्या कायम स्मरणात राहतील.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही बातमी दिली आहे. त्यांचे कलाविश्वातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे अमिताभ यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. प्रिया दत्त यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे. 

त्यांनी फराह खान आणि बोमन इरानीच्या 'शीरी फरहाद की तो निकल पडी' हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता. याशिवाय 'हम साथ साथ है', 'गोपी किशन'  यासारख्या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाचा बाज दाखवून दिला होता. याशिवाय छोट्या पडद्यावरील अनेक मालिकेत त्यांनी काम केले होते. त्यातील 'जबान संभाल के', 'श्रीमान श्रीमती', 'कभी ये कभी वो' या मालिका चांगल्याच गाजल्या होत्या.  


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सनी झाली सरोगसीद्वारे जुळ्याची आई