rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Shekhar Suman: अभिनेता शेखर सुमनचे नातेवाईक 24 दिवसांपासून बेपत्ता, सीबीआय चौकशीची मागणी

Veteran Bollywood actor and popular TV host Shekhar Suman missing for 24 days demand CBI probe
, शनिवार, 25 मार्च 2023 (15:12 IST)
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि लोकप्रिय टीव्ही होस्ट शेखर सुमन त्याच्या टीव्ही रिअॅलिटी शोमुळे चर्चेत असतात. शेखर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. आता काही दिवसांपासून अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता आणि नालंदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डॉक्टर यांचे नातेवाईक संजय कुमार गेल्या 24 दिवसांपासून बेपत्ता आहेत. आता नुकतेच या अभिनेत्याने पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
 
विशेष म्हणजे शेखर सुमनचे नातेवाईक गेल्या 24 दिवसांपासून बेपत्ता असून इतके दिवस उलटूनही पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या नातेवाइकांची अवस्था कोणालाच माहिती नाही. शेखरने खूप प्रयत्न करूनही पोलिसांना काहीच सापडत नाहीये. आता ब-याच दिवसांनी शेखरने पोलीस यंत्रणेचे निष्काळजीपणा सांगत आपल्या नातेवाईकाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
 
अभिनेता म्हणाला, 'संजय कुमार हा खूप सरळ माणूस आणि खूप चांगला डॉक्टर आहे. त्याला कोणताही शत्रू नव्हता किंवा त्याला कशाचीही चिंता नव्हती. तो असे पाऊल उचलू शकत नाही. ज्या ओव्हर ब्रिजवरून संजय गायब झाला त्यावर एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही.
 
 'संजयला शेवटचे 1 मार्च रोजी संध्याकाळी 7.42 वाजता पाटणाच्या गांधी सेतूवर पाहिले गेले होते, त्यानंतर तो तिथून कुठे गेला हे कळले नाही.' शेखर पुढे म्हणाले की, तो गप्प बसणार नाही. तो त्याच्या नातेवाईकांना शोधण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल. शेखर म्हणाले, 'मी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहे. जर पोलिस संजयचा शोध घेऊ शकले नाहीत, तर मी त्यांना हात जोडून विनंती करेन आणि सीबीआय एजन्सीला यात सहभागी करून घेण्याची विनंती करेन.
 
Edited By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

GHAR BANDUK BIRYANI - नागराज मंजुळे, सयाजी शिंदे चंद्रपूर पोलीसांच्या भेटीला