शिल्पा शेट्टी पुन्हा झाली आई, सरोगसीद्वारे दिला मुलीला जन्म

शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020 (12:34 IST)
मुंबई- शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरी पुन्हा पाळला हालला आहे. त्यांच्या घरी सरोगसीच्या मदतीने मुलगी जन्माला आली आहे. हे शिल्पा आणि राजचं दुसरं मुल आहे.
 
शिल्पाने इन्स्टाग्रामवर ही बातमी शेअर केली आहे. शिल्पा आणि राज यांनी 15 फेब्रुवारीला जन्माला आल्या मुलीचं नावं समीशा असं ठेवलं आहे. शिल्पाने लिहिले की, 'ओम गणेशाय नमः आमच्या प्रार्थनांना उत्तर मिळालं. आम्हाला हे सांगायला आनंद होतो की आमच्या घरी एका परीचं आगमन झालं आहे. समीशा शेट्टी कुंदार. समीशाचा 15 फेब्रुवारी 2020 ला जन्म झाला. घरात ज्यूनिअर एसएसके आली आहे.' तिनं समीशाच्या नावाचं अर्थ देखील सांगतिलं आहे.
 
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 22 नोव्हेंबर 2009 मध्ये लग्न केलं होतं. 21 मे 2012 मध्ये शिल्पाने विहानला जन्म दिला होता. आठ वर्षांनी शिल्पा आणि राजने सरोगसीद्वारे पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला. 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 

|| Om Shri Ganeshaya Namah || Our prayers have been answered with a miracle... With gratitude in our hearts, we are thrilled to announce the arrival of our little Angel,

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख कावेरी अम्मासाठी शाहरुखची भावनिक पोस्ट