‘भाबीजी घर पर है’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेनं निर्माता संजय कोहली विरोधात छेडछाडीची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. शुटिंगच्या दरम्यान प्रकरण निपटून घेण्याबद्दल बोलल्याचंही शिल्पानं तक्रारीत म्हटलं आहे. शिल्पानं ‘भाबीजी घर पर है’ या मालिकेत काम करणं बंद केलं आहे. याच्याच रागातून संजय कोहलीनं 3 महिन्यांचा पगार दिला नसून कुठेही मला काम देऊ नका, यासाठी इतर सिरीअलच्या प्रोड्युसरला सांगून बदनामी केल्याचाही आरोप शिल्पानं केला आहे.