Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोण होणार बिग बॉस 16 विनर?

bigbss 16
, मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (13:10 IST)
Instagram
बिग बॉस 16 च्या फिनाले वीकमध्ये, घरातील सदस्यांना दररोज काही ना काही रंजक गोष्टी पाहायला मिळत आहेत. ताज्या एपिसोडमध्ये, निर्मात्यांनी शोला पुढे नेण्यासाठी मिडवीक इव्हिकेशन सुरू केले, ज्यासाठी प्रेक्षकांना घराबाहेरून बोलावण्यात आले. मिडवीक इव्हिकशनमधील मतदानाच्या आधारावर, निमृत कौर अहलुवालियाला शेवटचा आठवडा गाठल्यानंतर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. प्रेक्षकांच्या मतदानाच्या आधारे बेदखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. बिग बॉसने काही प्रेक्षकांना घरात बोलावून थेट मतदान केले. यादरम्यान सर्व स्पर्धकांना प्राण्याच्या नावाचे चिन्ह देण्यात आले. यावर प्रेक्षकांना मतं द्यावी लागली. बिग बॉस विजेत्याच्या नावाशी निवडणूक चिन्हाचा हा संबंध लोकांना दिसत आहे.
 
 
प्रेक्षकांच्या मतदानाच्या आधारे, छोटी सरदारनी फेम अभिनेत्री निमृत कौर अहलुवालिया हिला बिग बॉस 16 च्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान असे काही घडले की लोक शिवला बिग बॉस 16 चा विजेता मानत आहेत. वास्तविक, प्रेक्षकांच्या मतदानादरम्यान बिग बॉसने घरातील सदस्यांना प्राण्याला मतदान करण्याचे चिन्ह दिले होते. यावेळी शिव ठाकरे यांना घोड्याचे चिन्ह मिळाले. विशेष म्हणजे बिग बॉस 16 च्या विजेत्याच्या ट्रॉफीचे जे चित्र समोर आले आहे ते देखील घोड्याच्या डिझाईनचे आहे. अशा परिस्थितीत बिग बॉसचे चाहते शिव ठाकरे या शोचे विजेते आहेत की काय, असा अंदाज लावत आहेत! बिग बॉसच्या या इशाऱ्याने शिवाच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
 
घरातून मिडवीक इविक्शन करण्यात आले होते, ज्यामध्ये 6 सदस्य अर्चना, निमृत, शिव, शालीन, प्रियांका आणि एमसी स्टॅन अंतिम आठवड्यात पोहोचले होते. प्रेक्षकांच्या मतदानाच्या आधारे निमृत कौर अहलुवालिया यांना घरातून बाहेर काढण्यात आले आहे. म्हणजेच, आता शोमध्ये फक्त 5 सदस्य उरले आहेत, जे बिग बॉस 16 चे टॉप 5 स्पर्धक बनले आहेत. बिग बॉस 16 चा फिनाले 12 फेब्रुवारीला होणार आहे. बिग बॉसच्या अंतिम फेरीत फक्त 3 लोक पोहोचतात. अशा परिस्थितीत या आठवड्यात कोण जाणार आणि टॉप 3 मध्ये कोण पोहोचणार हे पाहावं लागेल.
Edited by : Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा 3600 एपिसोडनंतरही वाद सुरूच का आहे?