Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 9 April 2025
webdunia

ऐतिहासिक ‘पृथ्वीराज'चे शूटिंग सुरू

Shooting
, बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (16:20 IST)
अक्षय कुमार पुढील महिन्यात रिलीज होणार्याे दुसर्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करुन तो परत मुंबईला
आला आहे. दिग्दर्शक चंद्र प्रकाश द्विवेदी यांच्या ‘पृथ्वीराज'च्या चित्रीकरणासाठी अक्षय कुमारने मुंबईत शूटिंग सुरू केले आहे. यासाठी भव्य इनडोअर सेट बसविला गेला आहे, जिथे आरोग्याशी  संबंधित नियम लक्षात घेऊन चित्रपटाचे युनिट शूटिंग करत आहे. देशात कोरोना विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी या मोठ्या बजेटच्या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. उर्वरित शूट पूर्ण करण्यासाठी यशराज फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये एक भव्य सेट तयार करण्यात आला आहे. अक्षने शूटिंगला सुरुवात केली.
 
त्याच बरोबर अभिनेता सोनू सूद देखील शूटिंगला लागला आहे. चित्रपटाची नायिका मानुषी छिल्लरही या वेळापत्रकात सहभागी होणार आहे. चित्रपटात खास व्यक्तिरेखा साकारणारे संजय दत्त दिवाळीनंतर आपला शूटिंगचा भाग पूर्ण करणार असलचेही समजते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Viral Video अमिताभ बच्चनने शेअर केला मराठी गीत गात असलेल्या वडील आणि चिमुकल्याची जोडी