बॉलीवूडचा शेहनशहा बिग बी ची लेक श्वेता नंदाने 42 व्या वर्षी मुंबईत फॅशन शोमध्ये केलेल्या रॅम्प वॉकने उपस्थितांची मने जिंकलीच पण या कार्यक्रमासाठी मुद्दाम हजर राहिलेल्या अमिताभची छातीही अभिमानाने फुलून आली. डिझायनर अबू जानी व संदीप खोसला यांच्या या फॅशन शोमध्ये श्वेता शो स्टॉपर ठरली. पांढर्या पायघोळ गाऊनमध्ये पिसाची टोपी घालून आलेल्या श्वेताने अत्यंत आत्मविश्वासाने हा वॉक केला.
आजपर्यंत श्वेता कटाक्षाने प्रसिद्धीपासून दूर राहिली आहे. तिची कन्या नव्या नवेली सध्या सोशल मीडियावर गाजते आहे. त्याचवेळी एखाद्या परीसारख्या दिसणार्या श्वेताने रॅम्पवर येताच उपस्थितांच्या दिलाची धडकन अक्षरक्ष: थांबविली असे समजे. या कार्यक्रमाला जया बच्चन, अभिषेक बच्चन यांच्याबरोबर सोनाली बेंद्रे, करण जोहर व अन्य बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते.