Publish Date: Wed, 07 Feb 2018 (12:32 IST)
Updated Date: Wed, 07 Feb 2018 (12:38 IST)
दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या 'अय्यारी' सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने
सिनेमाला प्रमाणपत्र दिलं आहे. या सिनेमात संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेत काही बदल सुचवले होते. मात्र निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा सिनेमा 16 फेब्रुवारीला रिलीज होईल. याआधी आपल्या प्रतिनिधींनी सिनेमाला मंजुरी दिल्याशिवाय सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट देऊ नये, असं सांगत संरक्षण मंत्रालयाने हरकत घेतली होती. त्यानंतर संरक्षण मंत्रालयासाठी 'अय्यारी' सिनेमाचं खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. संरक्षण मंत्रालयातील काही अधिकारीही या शोला उपस्थित होते. .
अय्यारी हा सिनेमा सुरुवातीला 25 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र त्याच दिवशी पद्मावत आणि पॅडमॅन यांसारखे दोन तगडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमनेसामने आल्याने अय्यारीने आपली रिलीजिंग डेट 9 फेब्रुवारीला हलवली. मात्र आता ही तारीख पुढे ढकलत 16 फेब्रुवारी करण्यात आली आहे.