Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आशा भोसलेही आता मादाम तुसामध्ये

आशा भोसलेही आता  मादाम तुसामध्ये
, बुधवार, 14 जून 2017 (11:13 IST)
सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा मेणाचा पुतळा जगप्रसिद्ध मादाम तुसा संग्रहालयात उभारण्यात येणार आहे. दिल्ली येथील संग्रहालयात हा पुतळा बसविण्यात येईल.
 
पुतळा उभारण्यात येणाऱ्या त्या पहिल्याच गायिका ठरल्या आहेत. आपल्या सुरेल आवाजाच्या जादूने गेली अनेक वर्ष आशा भोसले यांनी  भारतासह जगातील श्रोत्यांच्या मनावर राज्य केले आहे.
 
ही गोष्ट आपल्यासाठी आनंदाची असून माझा मेणाचा पुतळा पाहण्यास मी उत्सुक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
 
 
छायाचित्र : आशा भोसले यांच्या ट्विटर अकाऊंटवरून साभार

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रणवीर सिंगने ट्वीटरद्वारे केले 'भिकारी'चे टिजर पोस्टर लाँच